देश

‘त्या’ गावात विराट-अनुष्काला कोणी ओळखलंच नाही!

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी संपुर्ण जगभर प्रसिद्ध आहे. मात्र  भूतानमधील एक कुटुंब अपवाद ठरलं आहे. जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या जोडीला भूतानमधील एका कुटुंबियांनी ओळखलंच नाही.

एखाद्या सामान्य पाहुण्यांचं ज्याप्रमाणे स्वागत केलं जातं तसंच स्वागत या कुटुंबियांनी विरुष्काचं केलं. परंतु  कुटुंबियांनी केलेलं स्वागत विरुष्काला प्रचंड आवडलं असून अनुष्काने या कुटुंबियांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आज आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. एका गावातील काही पाळीव प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी आम्ही थोडा वेळा थांबलो होतो. एक पिल्लू तर प्रचंडच लहान होतं. या पिल्लासोबत खेळत असताना त्यांच्या मालकाने आमची विचारपूस केली. इतकंच नाही तर तुम्ही थकला आहात का? चहा पिणार का? असंही विचारलं. विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला ओळखलंच नाही, त्यांना माहितच नव्हतं की आम्ही कोण आहोत, असं अनुष्काने सांगितलं आहे. 

या कुटुंबातील सगळ्याच सदस्यांनी आमच्यासोबत मस्त गप्पा मारल्या. ते केल आम्हाला ट्रेकर्स समजत होते आणि ट्रेकिंग करुन आम्ही थकलो आहोत हेच त्यांना माहित होतं. आयुष्याचा खरा अर्थ काय हे मला नेमकं माहित नाही, मात्र या कुटुंबाची ही एक आठण आहे जी आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू, असंही अनुष्काने म्हटलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या