पुण्यात घडली थरारक घटना; प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली अन् पुढं घडलं भयंकर

Pune Crime l विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातून काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये तरुण निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रेमप्रकरणातून घडली धक्कादायक घटना :

पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, निलेश शिंदे आणि सुशील काळे या दोघांची गर्लफ्रेंड एकच आहे. सध्या त्या युवतीचे सुशील काळे या तरुणासोबत प्रेमसंबंध असून ती निलेश शिंदे पासून दूर झालेली आहे. मात्र असे असताना देखील निलेश शिंदे त्या तरुणीला त्रास देत होता अशी माहिती त्या तरुणीने पोलिसांना दिली आहे.

मात्र रात्री उशिरा एक्स बॉयफ्रेंड निलेश शिंदे हा युवतीला भेटायला आला होता. याबाबतची माहिती तरुणीने सुशीलला दिली होती. निलेश जेव्हा भेटायला आला तो युवतीशी बोलत होता, त्यावेळी सुशीलने चारचाकी गाडीने निलेशला उडवलं आहे. यामध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune Crime l आरोपीला पिंपरी पोलिसांनी केली अटक :

या धक्कादायक घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी सुशीलला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी चौकशी करून नेमका वाद कशावरून झाला यासंदर्भात माहिती घेतली. या सर्व प्रकरणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सुशील काळे या तरुणाला पिंपरी- पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेलं पोर्शे कारचं प्रकरण ताजं असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पुणे नागरिकांमध्ये संतापाच वातावरण पाहायला मिळत आहे. विद्येचं माहेरघर समजलं जाणाऱ्या पुण्यात अशा धक्कादायक घटना घडत असल्याने पुणे पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

News Title – Ex-Boyfriend Came to Meet Girlfriend, Lover Hits Car in Fury, Shocking Incident in Pimpri-Chinchwad

महत्त्वाच्या बातम्या

पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपाला दिला सर्वात मोठा धक्का

‘या’ तीन राशींच्या कुंडलीत होणार मोठे बदल

अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश?, छगन भुजबळांची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले..

सेल्फीच्या नादात नवविवाहितेने गमावला जीव; किल्ल्यावरून थेट..