लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल!

केरळ | लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्याविरोधात केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एका महिलेने ओमान चंडी यांच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. 2013 मध्ये हे प्रकरण घडल्याचा दावा संबंधीत महिलेने केला आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी चंडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पिडित महिलेने मुख्यमंत्री चंडी यांची खासगी भेट घेतली होती. तिला आपल्या व्यवसायात फायदा मिळवून देतो, असं आमिष दाखवून चंडींनी आपल्यावर अत्याचार केले, असा आरोप पिडितेने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अलाहाबादनंतर आता ‘या’ शहराचही नाव बदलणार!

-मुंबईत चाफा फुलवला तरच खासदार निधी देईल- रेखा

-टँकरमुक्त महाराष्ट्राची घोषणा कुठं गेली?, काँग्रेसचा फडणवीस सरकारला सवाल

-फडणवीस सरकारची जलयुक्त शिवार योजना फेल; 14 हजार गावांची भूजल पातळी घटली!  

-एका कुटुंबासाठी नेताजींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला; मोदींचा गांधी परिवारावर हल्लाबोल  

या बातमीवर तुमची कमेंट लिहा