बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडी ना काडी, ‘या’ कारणामुळे शितल म्हात्रे शिंदे गटात सामील

मुंबई | शिवसेनेतून शिंदे गटात सामिल होणाऱ्या आमदार, पदाधिकारी आणि नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेविका शितल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी शिवसेनेली सोडचिट्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांचे मतपरिवर्तन झाले असे म्हात्रे म्हणाल्या. त्यांनी शिंदे गटात सामिल झाल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्याची घटना घडली तेव्हा मला सुद्धा सर्वसामान्य नागरीकांप्रमाणे वाईट वाटले. परंतु बंड करुन गेलेल्या आमदारांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना सोडल्याची आणि शिंदे गट का पडला याची भूमिका जाणून घेतली, तेव्हा माझे मतपरिवर्तन झाले. आम्हाला असे वाटले की, ही भूमिका प्रत्येक नगरसेवकाची, प्रत्येक शिवसैनिकाची आहे. प्रत्येक शिवसैनिकाला बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन चालावे असे वाटते, असे शितल म्हात्रे म्हणाल्या.

महानगरपालिकेत प्रत्येक नगरसेवकाची गळचेपी होते आहे. काही मुठभर लोकांच्या हातात ही महानगरपालिका गेली आहे. मातोश्रीवर दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु वरिष्ठांनी आमचा आवाज उद्धव ठाकरेंपर्यंत (Uddhav Thackeray) पोहोचवला नाही. आज मी जे काही सांगत आहे, ते मुंबई महानगरपालिकेतील प्रत्येक नगरसेवकाची भूमिका आहे, असे म्हात्रे यावेळी म्हणाल्या.

पुढे बोलताना म्हात्रे म्हणाल्या, मी आमदार नाही आहे, खासदार नाही, मी साधी नगरसेवक सुद्धा नाही. मी माजी नगरसेविका आहे. मला ईडी नाही, काडी नाही, मला बॉक्स नाही ना कोणतीही पेटी आलेली नाही आहे. मला फक्त शिंदे यांचे हिंदुत्वाचे विचार पटले आहेत. आणि प्रामाणिकपणे शिवधनुष्य अंगावर घेणारी मंडळी मला पटली, म्हणून मी शिंदे गटात सामिल झाले आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…त्यामुळे औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही’, इम्तियाज जलील आक्रमक

नवीन संसद भवनाच्या राष्ट्रचिन्हावरुन वाद, ‘या’ कारणामुळे विरोधक आक्रमक

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका!

भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल; महिलेने केले अत्यंत गंभीर आरोप

अभिनेता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात; लंडनमध्ये घेणार सात फेरे?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More