पुणे | पुणे-नगर रस्त्यावरील शिक्रापूरच्या चाकण चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. ही कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि शिरुरचे माजी आमदार अशोक पवार थेट रस्त्यावर उतरले.
शिक्रापूरच्या चाकण चौकात होणारी वाहनकोंडी नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आज खुद्द माजी आमदार या वाहनकोंडीत अडकले मात्र तशा परिस्थितीत पुढे न जाता त्यांनी गाडीखाली उतरुन कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, नगर रोडवरील वाघोली, कोरेगाव, शिक्रापूर या गावांमध्ये वाहनकोंडींमुळे वाहनचालक त्रस्त आहे. रोज संध्याकाळी या गावांमध्ये चार-चार पाच-पाच किलोमीटर लांब रांगा लागतात.

महत्त्वाच्या बातम्या –
-…म्हणून चीनने मोदींना एवढ्या छोट्या कपातून दिला चहा!
-25 कोटी रुपयांची बोली, दालमिया ग्रुपला मिळाला लाल किल्ला!
-चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची चुप्पी, डोकलामवर चर्चा नाही!
-…अन्यथा गेल आम्हाला मिळाला नसता; पंजाबचा मोठा खुलासा
Comments are closed.