Top News

‘या’ नेत्याने जाहीर केली राजकीय निवृत्ती; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी अचानक संन्यास घेत असल्याची घोषणा केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचं व्हिडीओत सांगितलं आहे. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले होते. राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे हर्षवर्धन जाधव चर्चेत होते. हर्षवर्धन जाधव केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावईदेखील आहेत.

लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं हर्षवर्धन जाधव यांनी निवृत्ती जाहीर करताना सांगितलंय.

माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो, असं हर्षवर्धन सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

हा शिवसेना नेता राज्यपालांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

धोक्याची घंटा…. गेल्या 48 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

महत्वाच्या बातम्या-

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

…तर तुमचं नेटफ्लिक्सचं अकाऊंट बंद होऊ शकतं

निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या