सावधान! पिझ्झा-बर्गर खाताय?, तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

मुंबई | आजकाल असे कमीच लोक सापडतील ज्यांना बाहेरचं जेवण विशेषत: फास्ट फुड आवडत नसेल. काळ बदलला तसं रहाणीमान आणि खाण्या-पिण्याच्या पद्धती पण बदलल्या. पिझ्झा, बर्गर, कोल्डड्रिंक्स आणि असे अनेक अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ (Ultra Processed Food) आजकाल आवडीने खाल्ले जातात. मात्र, अशा पदार्थांचं दिर्घकाळ सेवन केलं तर काही गंभीर आजार उद्भवू शकतात.

तुम्हीपण अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांचं दिर्घकाळ सेवन करत असाल तर आत्ताच सावधान व्हा. कारण अशा पदार्थांचं सेवन आणि दीर्घकाळापासून खराब असलेली जीवनशैली कॅन्सर (Cancer) सारख्या भयंकर आजाराला निमंत्रण आहे.

अल्ट्रा प्रोसेस्ड फुड खाणाऱ्या जवळपास 29 टक्के पुरूषांना हा आजार झाल्याचं नुकतंच केलेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे. तर याच पदार्थांमुळे महिलांमध्ये कोलन कॅन्सरचा (Colon Cancer) धोका वाढल्याचंही स्पष्ट झालंय.

प्रोसेस केलेल्या अन्नापेक्षा हे अल्ट्रा प्रोसेस्ड फुड शरीरासाठी जास्त घातक आहे. अशा प्रकारच्या पदार्थांमध्ये काही घटक असे असतात ज्याचा आपण रोजच्या जेवणात वापर करत नाहीत. अल्ट्रा प्रोसेस्ड फुड सहज आणि कमी पैशात उपलब्ध होतात. सहाजिकच त्याच्या चवीमुळे आपण हे वारंवार खातो आणि त्यातील कॅलरीजमुळे आपलं वजन देखील वाढतं.

पिझ्झा, बर्गर, पास्ता, इंस्टंट नुडल्स व सुप, चिल्ड कोल्ड्रिंक्स, केक, बिस्किट अशा अल्ट्रा प्रोसेस्ड फुडमध्ये मीठ, साखर, चरबी मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे दिर्घकाळ अशा पदार्थांचं सेवन केलं तर कॅन्सर सारखा भयंकर रोग उद्भवू शकतो.

दरम्यान, सुमारे 23 हजार लोकांवर आणखी एक संशोधन करण्यात आले. यातून अल्ट्रा प्रोसेस्ड फुडचं सेवन करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अल्ट्रा प्रोसेस्ड फुड ऐवजी आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-