आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

मुंबई | कोरोनापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. यामध्ये सॅनिटायझर तसेच साबणाने वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो, मात्र यापैकी सॅनिटायझरचा अतिवापर धोकादायक ठरत असल्याचं समोर येत आहे.

वारंवार सॅनिटायझरचा वापर केल्याने त्वचाविकार उद्धभवू शकतात, तसेच खाज येणे, आग होणे, हात लाल पडणे असे आजार होऊ शकतात. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे गजकर्ण, त्वचा कॅन्सर तसेच पेशींवरही परिणाम होतो, असंही सांगितलं जातंय.

सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेता, त्याऐवजी शक्यतो साबणाचा वापर करावा. ज्यावेळी साबण आणि पाणी उपलब्ध होऊ शकत नसेल त्यावेळी सॅनिटायझर वापरावे. तसेच 60 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कहोल असलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा, असं डॉ. सुचिता लवंगरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काही घरांमध्ये बाजातून आणलेला भाजीपाला सॅनिटायझर्सने धुतला जात असल्याचं दिसून येत आहे. हा प्रकार देखील धोकादायक असून त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य धोक्यात येऊ शकतं.

ट्रेंडिंग बातम्या-

3 टप्प्यात खुले होणार व्यवहार; कोणत्या टप्प्यात काय आणि कधी सुरु होणार? वाचा…

केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?

 महत्वाच्या बातम्या-

जैन समाजाच्या चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर साधु-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी

“कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही”

“कोरोना रुग्णांसाठी मुंबईत आठवडाभरात 8 हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या