बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकीकडे सर्वसामान्यांचं दिवाळं तर दुसरीकडे इंधन विक्रीतून केंद्र सरकारची दिवाळी

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेल्या इंधनाच्या किंमतीमुळे सर्वसामान्य माणूस मेताकुटीला आला असतानाच दररोज इंधनाचे दर गगनाला भिडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता एकीकडे सर्वसामान्यांचं महागाईमुळे दिवाळं निघत असताना मात्र, केंद्र सरकारची दिवाळी साजरी होणार असल्याचं एकंदरीत चित्र दिसून येत आहे.

सहा महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या महसुलात मोठ्या प्रमाणात भर पडली असून आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्येच एक्साईज ड्युटीच्या महसूलात तब्बल 48 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

एक्साईज ड्युटीमधून सरकारला एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये एक लाख कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारी तिजोरी मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर गच्च भरल्याचं स्पष्ट होत आहे. आता तरी सरकार इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणार का?, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

मागच्या वर्षी 67 हजार 195 कोटी रुपये एक्साइज ड्यूटीमधून केंद्र सरकारला मिळाले होते. यावर्षी हा आकडा 1 लाख कोटींपेक्षा अधिक असल्याने इंधनामधून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ही दरवाढ कधी थांबणार?, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.

थोडक्यात बातम्या

‘तीन लोकांनी आमच्या घराची रेकी केली’, क्रांती रेडकरांचा गंभीर आरोप

सुपरस्टार रजनीकांत यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट!

‘समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही’; रामदास आठवले वानखेडेंच्या पाठीशी

‘सर, बेइज्जती केली जातेय…’, अन् समीर वानखेडे वैतागून भडकले

पाकला बरबाद करणं आमचं पहिलं लक्ष्य; ‘या’ कारणांमुळे इसिस खुरासान गटाने दिला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More