बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकाळपासून गायब होती 19 वर्षीय तरुणी, शोध घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

पुणे | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडल्यनं सगळीकडे एकच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. मृतदेह सापडलेल्या तरुणीचं नाव शुभांगी संजय भालेराव असून आंबेगाव तालुक्यातील गणेशवाडी येथे ही घटना घडली आहे.

19 वर्षीय शुभांगी शेतातील विहिरीतून शेतपंपाद्वारे चालू असलेले पाणी बंद करण्यासाठी सकाळी 9.30 वाजता घरातून बाहेर पडली होती. आई-वडिल दोघेही तेव्हा कामानिमित्त बाहेर गेले होते. वडिल जेव्हा कामावरुन घरी आले तेव्हा त्यांना शुभांगी घरी दिसली नाही. साडेअकरा वाजून गेले तरी तिचा पत्ता नव्हता, त्यामुळे ती कदाचित पोलीस भरती प्रशिक्षणासाठी अकॅडमीत गेली असावी असा त्यांचा समज झाला.

चौकशी करण्यासाठी शुभांगीच्या भावानं स्वप्नील खंडागळे याला फोन करत शुभांगी अकॅडमीला आली का? विचारलं असता त्याला ती तिकडे नसल्याचं समजलं. ती कुठे शेजारी गेली असावी असं वाटल्यानं तिच्या घरच्यांनी थोडा वेळ थांबून वाट पाहिली. तरीही शुभांगी घरी न परतल्यानं शोधाशोध सुरु केली. अखेर त्यांनी विहिरीत गळ टाकत शोधाशोध केली तेव्हा शुभांगीचे कपडे गळाला लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

दरम्यान, तेथील गावकऱ्यांनी शुभांगीला विहिरीतून बाहेर काढले असता ती मृत झाली असल्याचं निदर्शनास आलं. मात्र तिच्या चेहऱ्यावर, कानाच्या मागे, मानेजवळ आणि हाताच्या दंडाचे लोचके तोडलेले दिसून आल्यानं गावकऱ्यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करत असून ही घटना नेमकी कशामुळे झाली याचा ते शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या –

भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा खासगी व्हिडीओ व्हायरल, सिनेसृष्टीत खळबळ

शिवसेना दत्तात्रेय भरणेंवर नाराज?, ‘या’ नेत्यानं मागितला राजीनामा

“खोटं बोला पण रेटून बोला ही शरद पवारांची वृत्ती”

आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More