मुकेश अंबानींच्या घराजवळ स्काॅर्पिओनंतर त्याच ठिकाणी दुचाकी सापडल्यानं खळबळ
मुंबई | काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. त्याच्या बंगल्यापासून साधारण 100 मीटर अंतरावर ही स्काॅर्पिओ गाडी आढळली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास एजन्सी एनआयए करत आहे. त्यानंतर आता मंगळवारी त्याच जागेवर एक दुचाकी सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मंगळवारी मलबार हिल परिसरात वाहतूक पोलिसांना राखाडी रंगाची सुझूकी एक्सेस ही दुचाकी सापडली आहे. विशेष गोष्ट म्हणजे स्काॅर्पिओ ज्या ठिकाणी पार्क केली गेली होती, त्याच ठिकाणी ही दुचाकी सापडली आहे. ही दुचाकी वाहतूक पोलिसांना बेवारस स्थितीत सापडली आहे. स्काॅर्पिओ प्रकरणानंतर वाहतूक पोलीस अधिक सावध झाले आहेत.
ही दुचाकी सापडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवत गावदेवी पोलिसांना घटनेबद्दल कळलं होतं. घटनेची माहिती कळताच गावदेवी पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणी आधिक तपास चालू केला आहे. परंतू या प्रकरणात आणखी दुचाकी मालकाची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. पोलिसांच्या वाहन अॅपमध्ये देखील या गाडीची कोणतीही नोंद नाही.
दरम्यान, ही दुचाकी चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाला दुचाकीचा नोंदणी नंबर, इंजिन नंबर, चोसीस नंबर देऊन, दुचाकीच्या मालकाची अधिक माहिती मागितली आहे. तर सीसीटिव्हीवरून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
थोडक्यात बातम्या-
रश्मी शुक्लांनी भाजपमध्ये राहण्यासाठी ‘या’ आमदारावर आणला दबाव; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
विमाधारकांसाठी आनंदाची बातमी; अटी पूर्ण होत नसतील तर ‘या’ कालावधीत करू शकता पॉलिसी रद्द
अकोल्यात चक्क बकऱ्यांची बँक! ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ या बँकेचं काम जाणून घ्या तूम्हीही व्हाल थक्क
बाबो! शनया कपूरच्या बिकनीची किंमत आहे इतकी, जाणून घ्या
“आजपासून मी आरएसएसला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.