बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी काय कांड करणार?, मला कांड करायचा असता तर…’; सभेआधी वसंत मोरे संतापले

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात गणेश कला क्रिडा केंद्राच्या सभागृहामध्ये जाहीर सभा होत आहे. राज ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा रद्द करण्यात आला होता. स्वत: राज ठाकरे यांनी ट्विट करत 22 तारखेला सविस्तर बोलू , असं म्हटलं होतं. त्यातच आता मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेतील झारीतले शुक्राचार्य कोण?, असा सवाल करत मनातील खंत व्यक्त केली आहे.

वसंत मोरे आणि निलेश माझिरे आपल्या 20 समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार, अशा प्रकारची अफवा पसरवण्यात आलेली आहे. वसंत मोरे यांनी आपल्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरण्यात येत आहेत, असं म्हटलं आहे. निलेश माझिरे आणि वसंत मोरे शिवसेनेत प्रवेश करणार हे ऐकल्यावर मला धक्का बसला, असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

निलेश माझिरे हे एक शहराध्यक्ष असून एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याने गदारोळ झाला होता. या अफवा कोणी पसरवल्या हे मला माहित नाही. मात्र, खोट्या बातम्या पसरवून निलेश माझिरे यांना डावलण्यात आलं, असे आरोप वसंत मोरेंनी केला आहे. पुण्यात मी तयार केलेल्या टिमचं खच्चीकरण केलं जात असल्याची खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेआधीच वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह केल्याने पुण्यातील मनसेत सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. राज साहेबांना त्रास होईल अशी पार्टटाईम कामं काही कार्यकर्ते करत आहेत, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी; आषाढी वारीची जोरदार तयारी सुरू

‘माझ्यासोबत सेक्स केला तर…’; एलोन मस्कवर एअर होस्टेसने केला होता गंभीर ऑफर

तीन महिन्यापूर्वी सैन्यात भरती झालेल्या 22 वर्षीय प्रथमेश पवार यांना जम्मूत वीरमरण!

“हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात बुडवलं पाहिजे…”

सर्वात मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More