नवी दिल्ली | भारतातील प्रत्येक यंत्रणा आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (rss) ताब्यात आहे. प्रत्येक संस्थेत संघाचा माणूस आहे. त्यामुळे आपण केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात लढत नाही आहोत. तर भारताच्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात लढत आहोत, असं काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी म्हटलं आहे.
मी खरं बोलायला घाबरत नाही. मी खरं बोलतो. त्यामुळेच लोक माझ्यावर टीका करतात. मी जेवढं सत्य बोलेल तेवढा माझ्यावर हल्ला होईल. पण मी त्याला नाही घाबरत. माझ्यावर जेवढा हल्ला होईल. तेवढं मी शिकत असतो. मला चांगलं वाटतं, असंही राहुल गांधी म्हणाले.
पेट्रोल- डिझेल आणि गॅसचे दर वाढतच जात आहेत. पण अर्थमंत्र्यांचं त्याकडे लक्ष नाही. कोणत्याही गावात जा, शहरात जा, लोकच तुम्हाला सांगतील महागाई आहे म्हणून. लोकांना महागाई दिसते. पण सरकारला दिसत नाही, असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.
देशात आज लोकशाही शिल्लक राहिलीच नाही. रोज लोकशाहीची हत्या होत आहे. सध्या महागाई आणि बेरोजगारीवर कोणीच बोलत नाही. बोलणाऱ्यांना त्रास दिला जात आहे, असंही ते म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जदारांना धक्का
उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी गुड न्यूज; शिवसेनेचा भाजपला जोर का झटका
‘त्या’ डायरीने राऊतांची झोप उडवली; पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्त्वाची समोर
Comments are closed.