बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅलिवूडमध्ये पुन्हा खळबळ! ड्रग्ज प्रकरणी आता अभिनेत्री अनन्या पांडेला समन्स

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा सध्या ड्रग्ज प्रकरणी अडचणीत आहे. अशातच 20 ऑक्टोबर रोजी एनसीबीला आर्यन खानची व्हाॅट्सअॅप चॅट हाती लागली. ज्यामध्ये आर्यन खानची ड्रग्जच्या संबंधित संभाषण आहे. हे संभाषण दुसरं कोणी नसून अभिनेत्री अनन्या पांडेसोबत होतं. त्यामुळे आता अनन्या पांडेला देखील समन्स पाठवलं आहे.

अनन्या पांडेला समन्स पाठवलं असून तिला 2 वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. तसेच आज शाहरुखच्या घरावर अर्थाच मन्नतवर एनसीबी छापा टाकणार असून टीम मन्नतवर पोचलेली आहे. आता हे प्रकरण काय वळण घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई क्रूझ डग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे. 14 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात न्यायाधीशांनी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. त्यानंतर न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला राजकीय वळण देखील आलं असून अनेक राजकीय नेते आर्यन खानला पाठिंबा देत आहेत. क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या जामिनासाठी शाहरूख खान प्रयत्न करत आहे.

थोडक्यात बातम्या-

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More