बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत, एका ट्विटनं उडाली खळबळ

नवी दिल्ली | देशात आगामी काळात पाच राज्यांच्य विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारीला लागला आहे. काॅंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना पक्षप्रवेश आणि पक्षत्याग या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये राजकीय भुकंप झाला होता. असाच भुकंप काॅंग्रेसला पुन्हा एकदा हादरवणार असं सध्या बोललं जात आहे.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब काॅंग्रेसचे माजी प्रभारी हरीश रावत यांच्या ट्विटनं सध्या काॅंग्रेसची चिंता वाढवली आहे. हरीश रावत हे सध्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. निवडणूक रुपी सागर निवडीचा प्रश्न समोर असताना पक्षसंघटना बहुतांश ठिकाणी संघटनात्मक बांधणीसाठी सहकाराचा हात पुढे करण्याऐवजी एकतर पाठ फिरवत आहेत किंवा नकारात्मक भूमिका घेत आहेत, हे विचित्र नाही का?, असा सवाल रावत यांनी केला आहे.

ज्या समुद्रात पोहायचे आहे, सत्तेने तिथे अनेक मगरी सोडल्या आहेत. ज्यांच्या सांगण्यावरून मला पोहायचे आहे त्यांचेच प्रतिनिधी माझे हातपाय बांधत आहेत. अनेक वेळा मनात एक विचार येत होता की हरीश रावत आता पुरे झाले, खूप पोहलो आहोत, आता विश्रांतीची वेळ आली आहे. मग गुपचूप माझ्या मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज उठतो “न दैन्यं न पलायनम्”.  मी खूप अपमानित आहे, नवीन वर्ष मार्ग दाखवू शकेल. मला विश्वास आहे की भगवान केदारनाथजी मला या परिस्थितीत मार्गदर्शन करतील, असं निराशाजनक ट्विट रावत यांनी केलं आहे.

दरम्यान, रावत यांच्या या ट्विटनंतर काॅंग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. काॅंग्रेसच्या मातब्बर नेत्यांमध्ये रावत यांचा समावेश होतो. गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तराखंड काॅंग्रेसमध्ये इनकमिंग वाढली आहे. भाजपमधील नाराज चेहरे काॅंग्रेसमध्ये येत आहेत. परिणामी रावत नाराज असल्याचं बोललं जात आहे.

पाहा ट्विट-


थोडक्यात बातम्या 

IPL Auction चा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार मेगा लिलाव

काँग्रेसचा मंत्री बदलणार???, सोनिया गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

OBC Reservation: हिवाळी अधिवेशनात ठाकरे सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

“राज्य विकणं म्हणजे चहा विकण्यासारखं वाटलं का?”

लसीकरण झालेल्यांसाठी आनंदाची बातमी; आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More