बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ दिग्गज खेळाडूला संघातून वगळलं

दुबई | युएईमध्ये मोठ्या धडाक्यात विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. प्रत्येक संघ आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत आहे. क्रिकेट विश्वातील कधीकाळीचा सर्वात बलाढ्य संघ म्हणून गणला जाणारा दक्षिण आफ्रिकेला संघ सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. या विश्वचषकात आफ्रिका संघाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आता चालू सामन्यातून आफ्रिकेचा सर्वात धोकादायक खेळाडू क्विंटन डिकाॅकला सामन्यातून वगळ्यात आलं आहे.

सध्या टी ट्वेंटी विश्वचषकातील सुपर 12 संघात सामने चालू आहेत. आपल्या पहिल्या सामन्यात आफ्रिका संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता. 26 तारखेला म्हणजेच आज वेस्ट इंडिज संघासोबत आफ्रिकेचा दुसरा सामना होतं आहे. यादरम्यान आफ्रिकेच्या अंतिम 11 मध्ये संघाचा सर्वात दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज डिकाॅक याला वगळण्यात आल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर’ या प्रकरणामुळं डिकाॅक संघात नसल्याचं बोललं जात आहे.

सध्या स्पर्धेदरम्यान सर्व संघाकडून गुडघ्यावर बसून ब्लॅक लाईव्ह मॅटर या प्रकरणाबद्दल समर्थन व्यक्त केलं जात आहे. प्रत्येक सामन्यात आपण हा प्रकार करणार नाही असं डिकाॅक म्हटल्याने त्याला संघातून वगळण्यात आल्याचं बोललं जात आहे. परिणामी सध्या जगभर या प्रकरणाची चर्चा होत आहे. डिकाॅक हा आफ्रिकेच्या सलामी फलंदाजीचा कणा मानला जातो. म्हणूनच त्याच्या अनुपस्थितीत संघाच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनीही सतत असं गुडघ्यावर बसल्यानं हा मुद्दा सोडवला जाणार आहे का?, असा सवाल उपस्थित केला होता. पण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं संघाला इतर संघाप्रमाणंच कृती करण्यास सांगितल्यानं आफ्रिका संघात वाद निर्माण झाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

‘मी 50 लाख रुपये पाॅलिथीन बॅगेतून घेतले आणि…’; प्रभाकर साईलचा मोठा खुलासा

शेअर बाजारात एलन मस्क मालामाल! एका दिवसात कमावले 27,15,00,00,00,000 रूपये

“नवाब मलिकांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार, त्यांच्या सांगण्यावरूनच…”

शमीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांविरोधात फेसबूकची मोठी कारवाई

“आमच्या जीवाला धोका, जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या येत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More