बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्रासोबतचा ‘हा’ फोटो शेअर करत शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा; म्हणाली…

मुंबई | राज कुंद्रा प्रकरणाबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच आता शर्लिन चोप्राने राज कुंद्रासोबतचा एक फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्रा महत्वाची साक्षीदार आहे. तर तो फोटा “द शर्लीन चोप्रा” अॅपच्या पहिल्या शुटिंगचा असल्याचा शर्लीनने ट्विटमध्ये दावा केला आहे.

काही दिवसांपासुन अनेक माॅडेल आणि अभिनेत्रींची या प्रकरणाबाबत चौकशी सुरू आहे. तर अलिकडेच शर्लिन चोप्रालाही गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलवलं होतं. आता त्याच अभिनेत्रीने एका ट्विटमध्ये फोटो शेेेअर केल्याने तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

29 मार्च 2019 चा दिवस होता. आर्म्सप्राइम आयोजित “द शर्लिन चोप्रा” अॅपच्या पहिल्या कंटेटचं शूटिंग सुरू होणार होतं. माझ्यासाठी पहिला अनुभव होता कारण कधीही मी अशा अॅपसाठी काम केलेलं नव्हतं. सुरूवातीला शुटींगदरम्यान आनंदाचं वातावरण होतं आणि अगोदर ग्लँमरस व्हिडीओ होते मात्र पुढे ते सेमी न्युड आणि नंतर न्युड होत गेले, असा खुलासा शर्लिनने केला आहे.

दरम्यान, राज कुंद्राने माझ्याशी संपर्क साधला होता आणि त्या अॅपसोबत माझ्याशी करार झाला होता, असं शर्लिनने 8 ऑगस्ट रोजी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तसेच राज कुंद्रा विरोधात अगोदर मुंबई गुन्हे शाखेकडे जाणार असल्याचा दावाही शर्लिनने केला आहे.

थोडक्यात बातम्या

मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय!

‘…त्या दिवशी पुन्हा कडक लॉकडाऊन करणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

राज्यातील हॉटेल चालकांसाठी मोठी बातमी! रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी, पाळावे लागणार ‘हे’ नियम

‘भाजपचं मराठा आरक्षणावरील प्रेम पुतण्या मावशीसारखं’; शिवसेनेचा भाजपला टोला

“ठाकरेंचं मला सांगू नका माझा मुलगा पालिकेच्या शाळेत शिकत आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More