महाराष्ट्र मुंबई

….म्हणून त्याने भररस्त्यावर गर्लफ्रेंडवर गोळी झाडून नंतर स्वत: आत्महत्या केली; मुंबईतील घटनेने खळबळ

मुंबई | मुंबईतील मालाड भागात भर रस्त्यावर एका तरुणाने तरुणीला गोळी घालून तिची हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

मुलीचा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा झाला होता. त्यातूनच हे कृत्य घडले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघेही कांदिवली येथील धनगरवाडी परीसरात राहणारे होते.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत हे घटनास्थळी दाखल झाले होते. तसंच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख देखील घटनास्थळी आले होते. त्यांनी घडलेल्या प्रकरणाची माहिती पोलिसांकडून घेतली.

तरुणाने मुलीची हत्या करुन स्वत: आत्महत्या का केली? याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. पण या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरले होते. एवढंच नाही तर मुलीचा साखरपुडा देखील झाला होता. हत्ये आधी तरुणाने त्या मुलीला आपल्या गाडीवर बसवून कांदिवली भागातून मालाड भागात घेवून आला होता, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल- रोहित पवार

पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा!

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

लसीकरणानंतर दुष्परिणाम झाल्यास उपचाराची तयारी ठेवा- उद्धव ठाकरे

जळगावातील खळबळजनक घटना; पैशाचं आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या