बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक ! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह मुंबईतील तीन रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी

मुंब | मुंबई पोलिसांना शुक्रवारी अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. संंबंधित व्यक्तिने मुंबईमधील प्रमुख तीन रेल्वे स्टेशन आणि बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. ही माहिती मिळताच सगळीकडे मुंबई पोलिसांकडून बॉम्बची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तिने फोन करून दादर, भायखळा, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक आणि अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील बंगला उडवण्याची धमकी दिली. त्या बॉम्बची तपासणी करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे, दहशतवादविरोधी पथक, रेल्वे पोलीस, बॉम्ब शोधक आणि विल्हेवाट पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी शोध तपासणी सुरू केली परंतु मुंबई पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही.

अमिताभ बच्चन यांच्या चारही बंगल्यांची तपासणी करण्यात आली. मात्र त्या जागी काहीही संशयास्पद आढळलं नसल्यानं तो फोन खोटा आणि अफवा पसरवण्यासाठी होता. या अज्ञात व्यक्ती विरोधात मुंबई पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तिच्या लोकेशनची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी दिली.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी ज्या मोबाईलनंबर वरून फोन आला होता त्या नंबरवर पोलिसांनी परत फोन केला. त्यावर तो म्हणाला की मला त्रास देऊ नका, त्यानंतर त्या व्यक्तीने फोन बंद केला. पोलिसांनी सुत्र फिरवत फेक फोन कॉल प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या

आनंदाची बातमी! कोरोना लढ्यात भारतामध्ये आणखी एका लसीला मान्यता, केंद्रीय आरोग्य मंत्र्याची घोषणा!

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल…”

“चंद्रकांत पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत, दिल्ली हाय कमांड त्यांच्या पाठीशी”

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; कार्टानं याचिका फेटाळली

मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात गॅस गळती; रूग्णांना तातडीनं बाहेर काढलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More