बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे मनपात खळबळजनक प्रकार! मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

पुणे | पुणे महानगरपालिकेत आज खळबळजनक प्रकार घडला आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इधाटे यांना आज लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. यामुळे मंजुषा इधाटे यांना अटक करण्यात आली आहे. आज पुणे महापालिकेत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

विकास नावाचा व्यक्ती हस्तांतरण अधिकाराच्या मंजुरीसाठी विधी विभागाकडे गेला होता. यावेळी मंजुषा यांनी त्याची मंजुरी देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्यानंतर विभागाने मंजुषा इधाटे यांना रंगेहाथ पकडण्यासाठी एक सापळा रचला. लाचलुचपत विभागाने रचलेल्या या सापळ्यात मंजुषा रंगेहाथ अडकल्या.

पुणे महापालिकेतील मुख्य विधी अधिकाऱ्याच्या दालनात मंजुषा 50 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रंगेहाथ सापडल्या. सध्या विभागाने मंजुषा यांना गजाआड केलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईनंतर पुणे महापालिकेत एकंच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मंजुषा इधाटे गेल्या काही वर्षांपासून पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. 15 दिवसांनंतर इधाटे निवृत्त होणार होत्या. मात्र, निवृत्त होण्याअगोदरच त्या लाच घेतल्याप्रकरणी गजाआड गेल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी

छत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…

राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल

“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल

उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील? सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More