‘मोदींना अक्कल दाढ आली नव्हती तेव्हा नेहरुंनी इस्त्राेची स्थापना केली’

पुणे | लय झाली मन की बात, येऊन पहा काम की बात, नावाचे छायाचित्र प्रदर्शन सध्या पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण पंतप्रधानांवर सडकून टीका करणाऱ्या छायाचित्रांचं प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भरलं आहे.

‘मोदींना अक्कल दाढ आली नव्हती तेव्हा पंडित नेहरुंनी इस्त्राेची स्थापना केली होती’, अशा प्रकारची तिखट टीका करणारी छायाचित्रे प्रदर्शनासाठी लावली आहेत.

सोनिया गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी यांनी आयोजित केलेल्या ‘सेवा कर्तव्य त्याग सप्ताह’दरम्यान हे प्रदर्शन आयोजित केलं आहे.

दरम्यान, या प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आलं.

इस्रोची स्थापना

महत्वाच्या बातम्या-

-दलित-आदिवासी नव्हे, हनुमान तर जैन होते; जैन मुनींचा दावा

-पत्नीच्या दारु आणि शाॅपिंगच्या व्यसनाला कंटाळलेल्या पतीने केली आत्महत्या

-शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला नेहरुच जबाबदार- नरेंद्र मोदी

-निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव तोडून प्रचार

-बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष-बुलंदशहर हिंसाचाराचा मास्टरमाईंड गजाआड