महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसणार?; एक्झिट पोल्सची धक्कादायक आकडेवारी समोर

Exit Poll 2024

Exit Poll 2024 | 1 जून रोजी लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. 4 जूनरोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागेल. अशात विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची आकडेवारी जाहीर होत आहे.

काही मीडिया एक्झिट पोल्सनुसार, राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांना किती जागा मिळणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये पडलेली फुट हा मुद्दा खूप महत्वाचा ठरला.

या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच राज्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीपुर्वी (Exit Poll 2024 ) या सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार केला गेला. भाजपने यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 400 पारचा नारा दिला आहे.

महायुती vs महाविकास आघाडी

तर, दुसरीकडे इंडिया आघाडीकडूनही मोठा दावा करण्यात आला. अशात महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळणार, याबाबत काही एक्झिट पोल्सकडून आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काही मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात (Exit Poll 2024 ) महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज दिला आहे. भाजप 17, तर शिंदे गटाला 6 जागांचा अंदाज. अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय शक्य असल्याचं म्हटलं गेलंय. दुसरीकडे, मविआमध्ये काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 जागांचा अंदाज आणि शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महायुतीला मोठा फटका बसणार?

2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या (Exit Poll 2024 ) भाजपला यावेळी 17 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता. शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शिवसेनेतील शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत गेला. त्यामुळे भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला मोठं यश मिळेल, असा अंदाज होता. मात्र, एक्झिट पोलची आकडेवारी पाहता लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यात कोणत्या पक्षांनी किती जागा लढल्या?

महायुती

भाजप – 28
एकनाथ शिंदे – 15
अजित पवार – 4
महादेव जानकर – 1

महाविकास आघाडी

उद्धव ठाकरे गट – 21
काँग्रेस – 17
शरद पवार – 10

News Title :  Exit Poll 2024

महत्वाच्या बातम्या- 

प्रसिद्ध ज्योतिष अनिल थत्तेंची निकालाआधी मोठी भविष्यवाणी, म्हणाले…

अत्यंत आळशी पण तेवढेच बुद्धिमान असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक

काँग्रेस किती जागा जिंकणार?; नाना पटोलेंनी सांगितला आकडा

आयुष्यात यश मिळवायचं असेल तर ‘या’ सवयी आजच सोडा!

अपघातानंतर पोलिस आयुक्तांना फोन केला होता का?; अजित पवारांचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .