पुणे महाराष्ट्र

एक्झिट पोल लोकांच्या मनातील नाहीत- रोहित पवार

पुणे | एक्झिट पोलने वर्तवलेला अंदाज हा एक्झिट पोलचा अंदाज आहे तो लोकांच्या मनातील नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात एक्झिट पोल अंदाजाच्या विरोद्ध चित्र निकालाच्या दिवशी पाहायला मिळेल. यंदा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला 23 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

रविवारी देशभरातील एक्झिट पोलचे आकडे समोर आले. त्यानुसार देशात पुन्हा मोदी सरकार येईल, असा अंदाज सर्व वृत्तवाहिन्यांनी दिला आहे.

एक्झिट पोल कितपत खरे ठरतील हे आता येत्या 23 तारखेला सर्वाच्या समोर येईलच, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत जेवणाचं निमंत्रण

-‘त्या’ ट्विटमुळे ट्रोल करणाऱ्यांना फरानचे सडेतोड उत्तर

-आम्ही मुर्ख नाही; करण जोहरला नेटकऱ्यांनी सुनावले

प्रकाश आंबेडकरांचं सोलापूर, अकोल्यात काय होणार?; ‘न्यूज18’चा खळबळजनक अंदाज

-कोणत्याही एक्झिट पोलपेक्षा ‘एनडीए’ला जास्त जागा मिळतील- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या