Loading...

उद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत

मुंबई |  उद्या 16 जून रोजी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपकडून 5 तर शिवसेनेकडून 2 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे, आशिष शेलार, अनिल बोंडे ही नावे सर्वधिक चर्चेत आहेत. तर काही जणांची मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू आहे.

Loading...

शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे दलित मतांवर डोळा ठेवत भाजप आरपीआयला एक मंत्रीपद देणार असल्याचं समजतंय. अविनाश महातेकर यांचं नाव आरपीआयने नक्की केलं आहे.

दरम्यान, उद्या होणाऱ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-रामदास आठवलेंसाठी गुड न्यूज; ‘हा’ विश्वासू सहकारी होणार मंत्री?

-राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिपद मिळणार की नाही?

-…म्हणून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहांची भेट!

Loading...

-राज ठाकरेंच्या वाढदिवसाला 51 किलोचा ईव्हीएमच्या प्रतिकृतीचा केक

-संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही; उद्धव ठाकरेंचा ‘एमआयएम’वर हल्लाबोल

Loading...