बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि शरद पवारांकडून अपेक्षा – विनोद तावडे

सिंधुदुर्ग | भाजप नेते विनोद तावडे यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशा प्रकरणात पक्षनेतृत्व संवेनशील असावं लागतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून अपेक्षा असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांवर असे आरोप होतात. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने अतिशय संवेदनशीलपणे असायला हवं. कारण या गोष्टी लोकांच्या मनावर खूप परिणाम करत असतात. असं असताना मुख्यमंत्री असतील किंवा पवार साहेब असतील अशा जबाबदार व्यक्तींकडून कारवाईची कृती सामान्य माणसाला अपेक्षित आहे, असं विनोद तावडे यावेळी म्हणाले.

सर्वसामान्य माणसाला आज राठोड यांचा राजीनामा पाहीजे आहे. कारण, एका सर्वसामान्य मुलीचा जीव गेला आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलं आहे. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे. अधिवेशनाच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलेही नेतृत्व नक्की करेल असं मला वाटतं, असंही तावडे म्हणाले.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरूण राठोड हा संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. तर यवतमाळमध्ये गर्भपातावेळी पूजा अरूण राठोड, पत्ता शिवाजी नगर नांदेड अशी दोन नाव तपासात पुढे आली आहेत. त्यामुळे दोन्ही राठोड वेगळे आहेत की एकच हा सवाल उपस्थित होत आहे.

थोडक्यात बातम्या –

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पूजाच्या आईचा अरूण राठोडबाबत धक्कादायक खुलासा; म्हणाल्या…

बसा बोंबलत! ‘कंडोम’च्या नादात घालवले तीन लाख रुपये

“संजय राठोडांवर कारवाई करण्याची धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो”

लाॅकडाऊनबाबत विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मनमोहन सिंग नेहमी संकटांचा सामना करायचे, तुम्ही पळ काढत आहात- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More