बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कृणाल पंड्याच्या बॅगेत सापडली महागडी घड्याळं; मुंबई विमानतळावर 3 तास केली चौकशी

मुंबई | आयपीएल संपवून भारतात परतलेल्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू कृणाल पंड्या याला महसूल गुप्तचर संचलनालयाने ताब्यात घेतलं आहे. कृणालच्या बॅगेत दुबईवरून आणलेली महागडी रत्नजडित घड्याळं सापडली आहेत.

या घड्याळांवरील आयात शुल्क चुकवण्यासाठी कृणालने ही घड्याळं बॅगेत लपवली असल्याचं म्हटलं जातंय. या घडाळ्यांचा गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी कृणालला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतलं.

यानंतर डीआरआयकडून (Directorate of Revenue Intelligence) कृणालची तीन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलंय. ही घड्याळं सध्या मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या ताब्यात असून कृणालला सीमाशुल्क आणि दंड भरावा लागणार आहे.

कृणालने आणलेल्या या घडाळ्यांची किंमत जवळपास 1 कोटींच्या घरात आहे. परदेशातून भारतात आयात केल्या जाणाऱ्या चैनीच्या वस्तूंवर 38.5 टक्के इतका कर भरावा लागतो.

महत्वाच्या बातम्या-

“अमृताताई नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका; मानसिक स्वास्थ जपा”

अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत; प्रमोदसावंत

मला मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही- नितीश कुमार

..तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का?- प्रवीण दरेकर

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्र्यांकडे, राज्य सरकारने काढला आदेश

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More