बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समूह संसर्गासाठी भारताने तयार रहावं; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

नवी दिल्ली |   भारतात कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात वाढत चाललेला असताना आता तज्ज्ञांनी भारताला चिंतेचा आणि गंभीर इशारा दिला आहे. भारताला कोरोनाच्या समूह संसर्गासाठी अर्थात तिसऱ्या टप्प्यासाठी तयार रहावं लागणार आहे, असा इशारा पब्लिक हेल्थ फाऊंडेशन इंडियाचे अध्यक्ष प्रोफेसर के. श्रीनाथ रेड्डी यांनी दिला आहे.

देशव्यापी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात सूट मिळाल्यानंतर कोरोना आणखी वेगात पसरू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसंच देशातील काही भागांत करोनाचा तिसरा टप्पा अर्थात समूह संसर्गाला अगोदरच सुरुवात झालीये, असंही काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

देशात समूह संसर्ग सुरू झालाय असं मानूनच देशानं यासाठी योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे. समूह संसर्ग ही शक्यता नाही तर खराखुरा धोका आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील काही भागांत कोणताही प्रवास न करणाऱ्या आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न आलेले काही जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळात अधिक काळजी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 11 महत्त्वाच्या घोषणा

‘सरकारला जाग कधी येणार?’; KEM रुग्णालयाचा व्हिडीओ पोस्ट करत राम कदमांचा सरकारला सवाल

महत्वाच्या बातम्या-

स्वदेशी उत्पादनांसाठी रामदेव बाबा लाँच करणार ऑनलाइन पोर्टल ‘ऑर्डर मी’

दिलासादायक… पुण्यात आज मिळालेल्या रूग्णसंख्येपेक्षा डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या जास्त

राज्यात आज कोरोनाचे 1 हजार 576 नवे रूग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More