बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही, तो अनेक पिढ्यांपर्यंत आपल्यासोबत राहू शकतो”

मुंंबई | कोरोना महामारीमुळे गेली 2 वर्ष सर्वांना घरात बसून रहावं लागत आहे. एवढंच नाही तर अनेकांनी आपल्या जवळचे लोक कोरोनाने गमावले आहेत. हा कोरोना कधी एकदाचा संपतोय असा सवाल आता सर्वजण विचारत आहेत. मात्र आता कोरोना संपणारच नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

जेव्हा एखादा संसर्ग समाजात येतो, तेव्हा तो हळूहळू पसरत जातो. त्यानंतर तो स्थानिक पातळीवर पसरत जातो. फ्लूचा संसर्ग अनेक पिढ्यांपासून आपल्यासोबत आहे. तसंच कोरोनाच्या बाबतीत होईल. कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही. तो अनेक पिढ्यांपर्यंत आपल्यासोबत राहू शकतो, असं प्रा. डॉ. जी. व्ही. एस. मूर्ती यांनी सांगितलं आहे.

उत्तर आणि पूर्व भारतातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होण्यासाठी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागेल, असा अंदाज आहे. या महासाथीदरम्यान राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची घाई करणं हे कोरोना विषाणूची दुसऱ्या लाट वेगाने पसरण्याचं एक कारण ठरलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनाची पुढची लाट येण्यास पाच ते सहा महिने लागू शकतात. तोपर्यंत लोकांच्या शरीरात तयार झालेली प्रतिकारशक्ती संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे नोव्हेंबरच्या दरम्यान पुन्हा काळजीची स्थिती उद्भवू शकते, असं देखील डाॅ. मुर्ती यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये, आपलं हसं होऊ नये म्हणून…”

“मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडली पाहिजे”

‘परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली’; कार डिझायनरच्या पत्राने खळबळ

‘फेसबुक लाईव्ह म्हणजे नुसत्या कोरड्या गप्पा’; मुख्यमंत्र्याच्या भाषणावर भाजपने विचारले हे ‘6’ प्रश्न

एका मृत्यूचा मुद्दा बनवला जातोय, लसीचे दोन डोस घेऊन मेलेल्या अनेक डॉक्टरांचं काय?- बाबा रामदेव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More