बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना संसर्ग वाढवण्यास लसी न घेणारे लोकचं कारणीभूत आहेत”

बंगळुरू |  भारतात कोरोनामुळं आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. सरकारी आकड्यानुसार देशात दररोज 3 हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत असल्याचं समोर येत आहे. मात्र, स्मशान घाट आणि स्मशानभूमीतून येणार्‍या संख्येमध्ये मोठी तफावत असल्याचं आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील तज्ज्ञ आता उघडपणे बोलत असून आपली भूमिका मांडत आहेत.

बंगळुरू येथील श्री जयवेद इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्स अँड रिसर्चचे प्राध्यापक डॉक्टर प्रसन्नसिम्हा हे सांगतात की, देशातील सध्याच्या परिस्थितीला ज्यांना संधी असूनही लस घेतली नाही असे लोक जबाबदार आहेत. तसेच या लोकांनी इतर रुग्णांच्या चांगल्या उपचारांचा हक्कदेखील काढून घेतला आहे. डॉ. प्रसन्नसिम्हा यांच्या मते, देशातील सध्याच्या मृत्यूला आणि वाढत्या प्रादुभार्वाला लसी न घेणारे लोकचं कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपल्या देशात एक विचित्र गोष्ट आहे, भारतातील लोकांना जीवनरक्षक लसीची भीती वाटते, मात्र कोरोनाच्या मृत्यूची नाही.

लसीकरणाबाबत लोकांच्या मनात जी शंका होती, तीच सर्वात मोठं हत्यार म्हणून समोर आली आहे. ज्या लोकांना संधी असूनही लस घेतली नाही. तीच लोक मरत असल्याचा दावादेखील डॉ. प्रसन्नसिम्हा यांनी केला आहे. जर या लोकांनी लस घेतली असती तर आज लोक उपचारासाठी वणवण भटकत राहण्याची वेळ आली नसती. त्यांना ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आदी सुविधांचा तुटवडा जाणवला नसता.

दरम्यान, जर घरातील वृद्ध लोकांचे लसीकरण झाले नसेल तर त्यांना लवकरात लवकर आयसोलेट करत शक्य तितक्या लवकर त्यांच्या लसीकरणाची व्यवस्था करा. त्यासोबतच घरातेदखील मास्कचा वापर करा, असंही त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या सरकारला ‘या’ सूचना

राहुल बजाज यांचा बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

“आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?”; गोपीचंद पडळकर यांची राजेश टोपेंवर टीका

पुण्यात शववाहिकांचा तुटवडा; प्रादेशिक परिवहन विभागाने ‘या’ वाहनांना दिली शववाहिकेची परवानगी

लसीचे 2 डोस घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह पण पूर्णपणे ठणठणीत- मुख्यमंत्री अशोक गहलोत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More