बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron Variant चा लहान मुलांना धोका?; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

मुंबई | भारतात (India) दुसऱ्या लाटेने प्रचंड हाहाकार माजवला होता. त्यानंतर देशातील कोरोनारूग्ण संख्येत मोठी घट झाली होती. त्यामुळे देशातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) जगाची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हायरसचा लहान मुलांना धोका आहे का? या संदर्भात तज्ज्ञांनी काही सल्ले दिेले आहेत.

लहान मुलांचं अद्याप लसीकरण सुरू करण्यात आलं नाही. त्यामुळे लहान मुलांना ओमिक्रॉन व्हायरसचा धोका आहे, अशी चिंता पालक व्यक्त करत आहेत. यावर तज्ज्ञांनी  घाबरून जाण्याची काही गरज नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली येथील एम्स विभागाचे (AIIMS Department) अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल (Additional Professor Dr. Neeraj Nischal) म्हणतात की, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही प्रौढांपेक्षा अधिक असते. लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

तसेच देशात कोरोनाची दोन वेळा लाट आली. दोन्ही लहरींमध्ये लहान मुलांना कोरोना झाला. मात्र, त्यांना लक्षणे आढळली नाहीत, असं डॉ. नीरज निश्चल यांनी म्हटलं आहे. ज्या मुलांना अगोदरचं काही आजार होते त्यांनाच रूग्णालयात दाखल करण्याचा वेळ आली, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ज्या पालकांनी अद्याप लसीकरण केलेलं नाही त्यांनी स्वत:चं लसीकरण करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका, असं डॉ. जुगल किशोर यांनी म्हटलं आहे. तसेच या नविन प्रकाराबाबत अशी कोणतीही माहिती समोर आली नाही की, अधिक धोकादायक आहे किंवा मृत्यू होतात. त्यामुळे घाबरून न जाता संरक्षणासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“R.R.Patil यांनी चोख काम केलं होतं, आता अभद्र युती तोडण्याची गरज”

च्युइंगम खाल्ल्याने कोरोना रोखता येतो?, शास्त्रज्ञांनी केला ‘हा’ दावा

मिर्झापूर वेब सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, बॅालिवूडमध्ये खळबळ

“2024 ला मोदीच सत्तेत येणार, लोकं मोदींवरच विश्वास ठेवणार”

मोठी बातमी! भारतात Omicron ची एन्ट्री, ‘या’ राज्यात आढळले रूग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More