बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचं तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ गंभीर कारण, म्हणाले….

नवी दिल्ली | कोरोना (Corona) महासाथीच्या रोगानं संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. अद्यापही कोरोनाचं सावट घोंगावत असून नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. कोरोना नियंत्रणात आला असताना मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं चिंतेत भर पाडली आहे.

दिल्लीतील कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे. दिल्लीतील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ होण्यामागे वायू प्रदूषण (Pollution) हा एक मोठा घटक असू शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. परिस्थिती पुन्हा बिघडू नये हे लक्षात घेता सरकार नागरिकांना कोरोना प्रोटोकॉलचं सतत पालन करण्याविषयी सतर्क करत आहे.

प्रदूषणाची पातळी वाढली की कोरोनाची प्रकरणंही वाढू लागतात, असं अभ्यासातून समोर आलं आहे. कोरोना विषाणूचा पुन्हा वाढता प्रभाव हा चिंतेचा विषय असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, दिल्लीसह कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावं असा सल्ला दिला आहे. आता महाराष्ट्रात देखील मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनानंतर बर्ड फ्लूचं सावट; ‘या’ ठिकाणी माणसामध्येही आढळला H3N8 स्ट्रेन

“आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल?”

छगन भुजबळांना ईडीचा मोठा दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुढील 2 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“यांच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी टोमॅटो सॉस भरलाय म्हणूनच…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More