बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा”

पालघर | राज्यात काही पक्षांनी पुढील निवडणूका स्वबळावर लढवणार असल्याचा नारा दिला आहे. त्यामुळे सध्या राज्यामध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यात शिवसेना पक्षाचे आमदार प्रतार सरनाईकांच्या पत्रामुळे राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांच्या पे रोलवर बोलण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा, असं म्हणत पाटलांनी राऊतांना चांगलाच टोला लगावला आहे. आज चंद्रकांत पाटील पालघरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर संजय राऊत यांनी बोललं पाहिजे, असंही पाटीलांनी म्हटलं आहे.

तसेच आम्हाला हिंदुत्व पाहिजे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला तोच संदेश दिला आहे. पूर्वीच्या युतीत आम्ही समाधानी होतो. आताची युती नैसर्गिक नाही, अशा शिवसैनिकांच्या भावना असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी दिल्लीला विरोधी पक्षांची बैठक आहे. त्याबाबतही पाटलांना विचारण्यात आलं. त्यावर काँग्रेस, पवार कोण काय कधी करेल सांगता येत नाही. कोण कुणाला भेटतंय ते कळत नाही. देशाच्या राजकारणात काय चाललंय ते समजण्याच्या पलिकडे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनानंतर आता ‘निपाह’चा धोका?; राज्यात प्रथमच वटवाघूळांमध्ये आढळला निपाह व्हायरस

गोवर लस कोरोनावर प्रभावी; पुण्यातील महाविद्यालयाचं मोठं संशोधन

“शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको”

मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल येणार जीएसटीच्या कक्षेत?; न्यायालयाने सरकारला दिला ‘हा’ आदेश

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 91 दिवसातील निच्चांकी, रूग्णसंख्येत 11 हजारांची घट

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More