बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका; आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

मुंबई | राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं बोललं जात आहे. अशात कोविडच्या नियमांचं योग्य पालन न केल्यास एक ते दोन महिन्यांत महामारीची तिसरी लाट राज्यात येण्याची भीती असल्याचं मत टास्क फोर्सनं व्यक्त केलं.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकारनं आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक तीऔषधे, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या खूपच जास्त होती. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेतही रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता जास्त आहे, असं राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ अशी भीती टास्क फोर्समधील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणं यावर भर देताना निर्बंधांचं पालन काटेकोरपणे होणं गरजेचं आहे, असंही सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

भाजपला लागणार मोठी गळती, अनेक बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर….’; सौरव गांगुलीने दिला खास सल्ला

‘सर्वगुण संपन्न असला तरी…’ खंत व्यक्त करत शिल्पा शेट्टीने केला राज कुंद्राचा खुलासा

मूक आंदोलन सुरुच राहणार, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही – संभाजीराजे भोसले

‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या नावामुळे वातावरण तापलं, अक्षय कुमारचा पुतळा जाळत केली नारेबाजी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More