‘मी बंगळुरू सोडलं नाही’; हितेशा चंद्राणीचं इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्टीकरण!
बंगळुरू | काही दिवसांपूर्वी एका महिलेनं झोमॅटोवरून जेवण मागवलं होतं. मात्र, ऑर्डर यायला उशिरा झाल्यामुळे तिने मागवलेलं जेवण कॅन्सल केलं. या गोष्टीचा राग आल्यानं डिलीव्हरी देणाऱ्या मुलाने तिला मारलं आणि यात तिला नाकाला जबर मार लागला असा दावा एका व्हिडिओद्वारे तिने केला हाेता. हितेशा चंद्राणी हिनं डिलिव्हरी बॉयच्या विरोधात एफआयआर देखील केली होती. त्यानंतर कामराजची चूक नसून हितेशाची चूक होती, असा खुलासा नुकताच झाला. त्यानंतर आरोप करणारी हितेशा फरार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
हितेशा चंद्राणी या माॅडेलवर डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कामराज या डिलिव्हरी करणाऱ्या मुलाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार शिवीगाळ करून मारहाण करणे आणि खोटी तक्रार दाखल करणे हे आरोप हितेशावर करण्यात आले.
हितेशाबद्दल सध्या समाजमाध्यमावर अनेक अफवा पसरत आहेत. ती फरार आहे, किंवा ती बंगळुरू सोडून गेली. अशा अफवांना पेव फुटलं आहे. या सर्व आरोपांना उत्तर देताना हितेशा चंद्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत मला सुरक्षित वाटत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामध्ये तिने आपण बंगळुरू सोडून कुठेही गेलो नसून पोलिसांना तपासामध्ये पूर्ण सहकार्य करत असल्याचंही म्हटलं आहे. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने बंगळुरू हे माझ्यासाठी घरासारखं आहे, मी ते सोडून कुठेही गेले नाही. त्यामुळे मी फरार असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचं तिनं स्पष्ट केलं.
गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. तसेच अनेक बड्या मंडळींनी या वादात उडी घेऊन कामराजच्या बाजुने उभं राहण्याची भुमिका घेतली होती. बॉलिवुडची अभिनेत्री परिणीती चोप्राने देखिल या वादात उडी घेऊन या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर समोर आणण्याची विनंती झोमॅटोला केली होती. “कामराज हा डिलिव्हरी बॉय दोषी आहे असं मला वाटत नाही, त्यामुळे झोमॅटोने चौकशी करून या प्रकरणात न्याय मिळवून द्यावा”, अशा आशयाचं ट्विट करून परिणीती कामराजच्या बाजुने उभी राहीली होती.
थोडक्यात बातम्या –
“तुम्हाला जर फाटकी जीन्स घालायची असेल तर कूल दिसा भिकाऱ्यासारखं नाही”
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!
विराटपेक्षा रोहितच लय भारी! संघाची सूत्र हाती आल्यावर निसटलेला सामना आणला खेचुन
वाह! क्या बात है ‘कजरारे’ गाण्यावर कृणाल पंड्याने लावले पत्नीसोबत ठुमके, पाहा व्हिडीओ
सोने विक्रीबाबत सरकारचा ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
कोरोनाचा संसर्ग वाढला, महाराष्ट्र नंतर ‘या’ राज्याने लागू केले कठोर निर्बंध
Comments are closed.