बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील राज्य परिवहन वाहतुकीबाबत परिवहन मंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारतर्फे कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानुसार नागरिकांना आता आंतरजिल्हा प्रवास अत्यावश्यक कारणाशिवाय करता येणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतुकीबाबतही महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्टीकरण देताना राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच धावेल, असं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात बसेस या जिल्हाअंतर्गत तसेच जिल्ह्याबाहेर ही धावतील पण त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावणार आहेत, या संदर्भातील संपूर्ण आराखडा मंत्रालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करून बनवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सध्या कोरोनामुळे आपल्या बसेस 50% क्षमतेने चालवत होतं. पण राज्य सरकारने लागू केलेल्या नियमावलीनंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी बसमधुन प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळ सध्या कार्गोसेवेतून नफा मिळवत आहे. यालाच महाकार्गो असं नाव देण्यात आलं आहे.

सध्या जिल्ह्याबाहेरील लोक आल्यानंतर त्यांना विलगीकरणात किती दिवस ठेवायचं आणि कोणत्या पद्धतीने ठेवायचं यावर मंत्रालयात चर्चा होणार आहे. तसेच महाराष्ट्रात क्षमतेपेक्षा कमी एसटी बसेस धावणार आहेत आणि राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनांचं पालन केलं जाणार असल्याची माहिती अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“एक जागा कायम रिकामी झाली, माझा भाऊ दुष्ट कोरोनाने टिपला”; पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं निधन

कोरोनाबाबत ‘नॅशनल प्लॅन’ काय?; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

देशात का भासतोय ॲाक्सिजनचा तुटवडा?, ही आहेत महत्त्वाची कारणं…

“कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तरच पगार मिळणार”

रोहित पवारांनी उभारले 1750 बेड्सचे कोव्हिड सेंटर, तुमचा आमदार-खासदार काय करतोय?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More