Top News ठाणे

आग विझवताना गॅस सिलेंडरचा स्फोट; अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी

ठाणे | शनिवारी वागळे इस्टेट परिसरातील एका दुकानाला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच एका घरगुती सिंलेंडर स्फोट झालाय.

या सिलेंडरच्या स्फोटात अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी झाले आहेत. शिवाय आजूबाजूला असलेली 4 दुकानं देखील जळून खाक झाली आहेत.

अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवत असताना बघ्यांनी गर्दी केली होती. तेव्हाच या घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात अग्निशमन दलाचे 3 जवान आणि 4 नागरिक जखमी झालेत.

यामध्ये जखमी झालेल्या रूग्णांना ठाण्यातील ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

थोडक्यात बातम्या-

येत्या 10 दिवसांत राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरु करण्याबाबत निर्णय घेणार

पुण्यात नवरदेवाच्या बापानं चक्क मेव्हणीचेच दागिचे चोरले, अन् लग्नात…

‘आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा’; प्रकाश आंबेकरांची मागणी

सर्वात मोठा निकाल!! गुटखा विक्री करणाऱ्याला आता 10 वर्षे शिक्षा!

‘शेतकरी आंदोलनामुळे ‘बर्ड फ्लू’ पसरत आहेत’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या