बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठमोळ्या ऋतुराजचा धमाका! मुंबईला दिलं 157 धावांचं आव्हान

मुंबई | आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरूवात झाली आहे. पाच वेळची आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स आणि तीन वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्याच्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने तुफान फलंदाजी केली आणि पहिल्या सत्रात चेन्नईने मुंबईला 157 धावांचं आव्हान दिलं आहे.

सर्वप्रथम टाॅस जिंकून चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत चेन्नईच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही. फाफ डुप्लेसीस, मोईन अली आणि अंबाती रायडू यांना भोपळा देखील फोडता आला नाही. तर रैना आणि धोनी देखील लवकर बाद झाले. मात्र ऋतुराज गायकवाड याने एक बाजू संभाळून ठेवली होती.

ऋतुराज गायकवाड आणि रविंंद्र जडेजाने आक्रमक खेळी करत चेन्नईची धावसंख्या सुरू ठेवली. तर शेवटच्या 5 षटकात ड्वेन ब्रावोने जबरदस्त फटकेबाजी केली. ऋतुराज गायकवाडने एक बाजू सांभाळून 58 चेंडूत 88 धावा केल्या. यात त्याने 9 चौकार तर 4 षटकार खेचले. ऋतुराज गायकवाड आणि ड्वेन ब्रावोने शेवटच्या 5 षटकात तुफान फटकेबाजी केली.

दरम्यान, ट्रेंड बोल्ड आणि अँडम मिल्नने चेन्नईच्या सलामी फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही. 24 धावांवर 4 गडी बाद अशी वाईट अवस्था चेन्नईची होती. ट्रेंड बोल्ड आणि अँडम मिल्न प्रत्येकी 2-2 बळी मिळले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘युनिव्हर्सल बाॅस’ ख्रिस गेल म्हणतोय! “मला पाकिस्तानात जायचंय, माझ्यासोबत कोण कोण येतंय?”

मुंबईतून ‘मुन्नाभाई’ला अटक; महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

कोण आहेत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

‘…अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माची अद्दल घडेल’; हसन मुश्रीफांचा पलटवार

‘किरीट सोमय्या आंतकवादी आहेत का?’; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More