बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली कार, पाहा व्हिडीओ!

मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मुंबई पोलिसांचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील दाखल झाले आहेत. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ ही कार उभी असून घातपाताची शक्यात वर्तवली जात आहे.

मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून तपासणी केली जात आहे. या कारमध्ये जिलेटीन स्फोटक, धमकीचं पत्र आणि चार गाडीच्या नंबर प्लेट असल्याची माहिती समजत आहे. तर मुकेश अंबानी यांना याआधी धमकीचं पत्र आलं होतं. अंबानींच्या नरिमन पॉईंट या कार्यालयात धमकीचं पत्र आलं होतं.

मुकेश अंबानी यांना केंद्र सरकारतर्फे सुरक्षा देण्यात आली आहे त्यासोबतच मुंबई पोलिसांची सुरक्षा तर आहेच. ही सुरक्षा तीन ते चार पद्धतीत असते. मात्र तरीही स्फोटक असलेली कार त्यांच्या बंगल्याबाहेर आढळल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.

दरम्यान, ही कार ज्या रोडवर उभी आहे त्या रोडवरून अनेक मोठमोठे मंत्री आणि उद्योगपती यांची ये-जा असते. संंबंधित परिसर हा व्हीआयपी परिसर आहे मात्र तरीही अशा प्रकारची कार आढळल्याने पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

संजय राठोड यांना मोठा धक्का; खासदार गिरीश बापट यांच्या सूनेकडून पोलिसात तक्रार दाखल

मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना, कोरोना- देवेंद्र फडणवीस

“आम्ही वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताईंसारखी “वाघा”ला साजेशी भूमिका घ्या!”

“दोन मिनिटाच्या भेटीत बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही”

‘पबजी लव्ह स्टोरी’; पबजी खेळत असताना जडलं प्रेम, विवाहित महिला झाली बेपत्ता त्यानंतर….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More