बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुसाट सुटणार गाड्या… महामार्गावरील ‘हा’ नियम लवकरच बदलणार!

नवी दिल्ली | एक्स्प्रेस वे वर प्रवास करताना कमाल वेग मर्यादेचा नियम आपल्याला नेहमी पाळावा लागतो, नाहीतर वेग मर्यादा भंग केल्याबद्दल चलन आपल्याला लगेचच प्राप्त होतं, मात्र आता यातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण काही महत्त्वाच्या महामार्गावरील कमाल वेग मर्यादा वाढवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात नुकतंच भाष्य केलं आहे, ते एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. यासंदर्भातील विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनूसार ही वेग मर्यादा 140 किमी प्रतितास करण्याचा विचार आहे.

एक्सप्रेस-वेवरील गाड्यांची वेग मर्यादा ही 140 प्रतितास किमी असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. चार पदरी राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादा ही 100 किमी प्रतितास असावी, तर दोन लेनचे रस्ते आणि शहरी रस्त्यांची वेग मर्यादा अनुक्रमे 80 किमी प्रतितास आणि 75 किमी प्रतितास असावी, असं गडकरींनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील वाहनांच्या वेग मर्यादेचे मानक ठरवणं, हे मोठं आव्हान आहे. कारच्या वेगाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत, त्यामुळं आम्ही काहीही करू शकत नाही. आज देशात एक्सप्रेस-वेवर कुत्रा सुद्धा येणार नाही, कारण रस्त्याच्या दोन्ही कडेला आम्ही बॅरिगेटींक केलेलं आहे, असंही गडकरींनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“वारकरी सांप्रदायाचा पाठिंबा म्हणजे साक्षात विठोबा-रखमाईचे आशीर्वादच”

“आई-वडिलांनी बिग बॅासमध्ये जाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण…”

परतीचा पाऊस झोडपणार! येत्या 24 तासात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

“ओबीसी आरक्षण ‘त्या’ विचारांना मान्य नाही, विरोधात कोण हे आता समजलं असेल”

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच्या अडचणीत वाढ; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More