Top News देश महाराष्ट्र मुंबई

10 चिमुकल्यांच्या मृत्यूबद्दल राहुल गांधींकडून दु:ख व्यक्त; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली | भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला आग लागून या आगीत 10 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त करत मृत बाळांच्या कुटुंबीयांना तातडीनं मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना अत्यंत वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो’, असं ट्विट राहुल गांधी यांनी आपल्या अकाऊंटवरुन केलं आहे.

तसंच, या दुर्घटनेमध्ये जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळं महाराष्ट्रासह देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यातच भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.


थोडक्यात बातम्या-

डीआरएसच्या निर्णयावरून चिडलेल्या टीम पेनने अंपायरना वापरले अपशब्द

आता गुन्हेगारांची खैर नाही!; …तर त्या फोनवाल्याला मी बघतो- अजित पवार

…मग त्या ‘औरंगाबाद’चं नामांतर कधी?; संजय राऊतांनी भाजपला खिंडीत गाठलं!

अत्यंत हृदयद्रावक!!! सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा मृत्यू

जाता जाता डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठा झटका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या