बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून ‘या’ बड्या नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता ज्यांनी ज्यांनी एकनाथ शिंदे यांना त्यावेळी पाठिंबा दिला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे.

उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची शिवसेनेतून (Shiv Sena) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले होते. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More