बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंकडून कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी

मुबंई | शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) फुटल्याने शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. शिंदे गटाच्या बंडाळीमुळे शिवसेनेला पडलेलं भगदाड दिवसेंदिवस वाढतंच आहे.

आमदारांनंतर नगसेवकांनीही बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बंडाळीनंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

शिवसेनेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेने आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांनी पक्षाविरोधात कारवाई केल्याच्या कारणावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. रामदास कदम यांची ओळख एक कट्टर शिवसैनिक अशी आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) काळात त्यांच्याकडे गटनेतेपद देण्यात आलं होतं. मध्यंतरी रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर आरोप केले होते.

पक्षाचे आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्यांची खंत त्यांनी व्यक्त केली होती. इतकं होऊनही पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता मात्र पक्षाविरोधात कारवाई केल्याच्या कारणावरून शिवसेनेनकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या कारवाईनंतर आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम हे दोघे शिंदेगटात सामील होणार का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

थोडक्यात बातम्या

SBI च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; बँकेने घेतला महत्त्वाचा निर्णय

एसटी बस अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर!

“लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार”

शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंवर आरोप करत ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा

इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More