बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MPSCच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी; पूर्व परीक्षेच्या अर्जासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही दिवसांपुर्वी पुर्व परिक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. आता 2021 अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आयोगाच्या निर्णयामुळे विद्यार्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

अनेक विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यात अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी करण्यात येत होती. ‘राज्य सेवा पुर्व परिक्षा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे’, असं एमपीएससीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  विविध विभागांकडून पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. यामध्ये उपजिल्हाधिकारी पोलिस उपनिरीक्षक, सहकार राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी या  पदांकरिता परिक्षा आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूून परीक्षेची घोषणा करण्यात येत नव्हती. यावरून एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता अर्ज करावयाच्या वेळेत वाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

तरूणाईला कमी वयातच का येतोय हार्टअटॅक? समजून घ्या ‘ही’ महत्त्वाची कारणं

भाजपच्या मैदानात राहुल गांधींची किक! गोव्यातील जनतेला दिलं ‘हे’ वचन

जारवो म्हणतो ‘मी पुन्हा येईल’; “भारताला माझी गरज…”

‘नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो’; चंद्रकांत पाटलांचा मलिकांना टोला

“काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊच शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More