Top News महाराष्ट्र मुंबई

एसटीच्या मासिक आणि त्रैमासिक पाससंदर्भात परिवहनमंत्र्यांची नवी घोषणा

मुंबई | टाळेबंदीदरम्यान ज्यांनी एसटीचे मासिक आणि त्रैमासिक पास काढेल होते परंतू त्यांना प्रवास करणं शक्य झालं नाही, अशा लोकांना पासचा परतावा देण्याचा निर्णय किंवा त्या पासला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक,त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

ज्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे,अशी महिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

दि. 22 मार्च 2020 पासून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परिणाम स्वरूप २२ मार्चपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रेमासिक पास काढले होते परंतू एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत आहे.

ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगारप्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, असेही परिवहनमंत्री परब यांनी संगितले.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोरोना भारतात येण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार”

भारत कोरोनाचा जागतिक केंद्रबिंदू बनण्याच्या मार्गावर; ‘ही’ गोष्ट ठरतेय सर्वात घातक

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ या पदकाने गौरविले जाणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

भारत चीन सीमेवर टोकाचा संघर्ष, राऊतांचे पंतप्रधान मोदींना मुलभूत पण कळीचे प्रश्न

राजेश टोपेंची महाराष्ट्राला पुन्हा एकदा गुडन्यूज…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या