Top News देश

वाहनचालकांना मोठा दिलासा; फास्टटॅग लावण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदवाढ

नवी दिल्ली | 1 जानेवारी 2021 पासून देशातील प्रत्येक वाहनाला फास्टटॅग असणं बंधनकारक असल्याची घोषणा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली होती. मात्र चारचाकी वाहनांसाठी केंद्र सरकारकडून मुदत वाढवून देण्यात आली आहे.

15 फेब्रुवारी 2021 पर्यंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना फास्टॅग लावण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. फास्टटॅग असल्याने आता वाहनांचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही वाचणार आहे.

फास्टटॅगच्या अकाऊंटमधून पैसे वजा झाल्यावर त्या धारकाला संदेश मिळणार आहे. अकाऊंटला तुम्हाला रिचार्ज करावं लागणार असून एका फास्टटॅगच्या अकाऊंटचा कालावधी पाच वर्षाचा असणार आहे. पाच वर्षानंतर तुम्हाला नवीन फास्टटॅग विकत घ्यावा लागणार आहे.

दरम्यान, सुट्टी दिवशी फिरायला गेल्यावर टोल नाक्यावर लागणाऱ्या लांब रागांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. फास्टटॅगसाठी वाहनाचं नोंदणीचं पत्र, वाहनाच्या मालकाचा फोटो, KYCसाठी आवश्यक कागदपत्र आणि वास्तव्याचा दाखला ही कागदपत्रे लागणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

शेजारील विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी त्यानं चक्क बोगदा खोदला; त्यानंतर…

रिया चक्रवतीच्या चाहत्यांसाठी नव्या वर्षात गुडन्यूज!

राम शिंदेंना विकासाचं काम कळत नसेल त्यांना गट-तट कळत असेल- रोहित पवार

अ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवला!

दहावी-बरावीच्या बोर्ड परीक्षांच्या आज तारखा जाहीर होणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या