Extramarital Affair | बिहारमध्ये काळीज हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. फतनपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील सुवंसा गावतील हे प्रकरण आता समोर आलं आहे. एका महिलेने पतीच्या मदतीने आपल्या बॉयफ्रेंडचे तुकडे पाडले आहेत. याप्रकरणामुळे तीन राज्यातील पोलीस आता हौराण झाले आहेत. (Extramarital Affair)
विनोद आणि त्याची पत्नी पुष्पा हरियाणा गुरुग्राम येथील एका प्रायवेट कंपनीत काम करत होते. पुष्पाच बिहारच्या शिवनाथसोबत (45) प्रेम प्रकरण सुरू होतं. पण ती लवकरच शिवनाथला कंटाळली. शिवनाथपासून तिला सुटका हवी होती. पण शिवनाथ हे नातं टिकवायला तयार होता. महिलेने ही गोष्ट आपला नवरा विवेकला सांगितली.
त्यानंतर नवरा आणि बायकोने प्लॅन बनवला. त्यानंतर पुष्पा प्लॅन बनवून सांगून तिथून आपल्या मूळ गावी निघून गेली. (Extramarital Affair)
पूनमच्या घरात मृतदेह पुरण्यात आला
तिने प्रियकर शिवनाथला गावी बोलावून घेतलं आहे. प्रयेसीने शिवनाथला बोलावल्यानंतर पुन्हा एकदा तो भेटायला तयार झाला. त्यानंतर पुष्पाने मैत्रीण पूनमला देखील बोलवलं. तिथे आधीपासून पुष्पाचा नवरा, पूनम आणि तिचा नवरा चिंतामणी हजर होते. शिवनाथ पुष्पाच्या घरी येताच त्याची हत्या केली. यावेळी त्याचे तीन तुकडे करण्यात आले आणि पूनमच्या घरात मृतदेह पुरण्यात आला. (Extramarital Affair)
विनोद आणि पुष्पा या घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर गुरूग्रमाला निघून गेले आहेत. बिहार पोलीस शिवनाथचा शोध घेत होती. तो पुष्पाच्या अनेकदा संपर्कात आला असल्याचं सांगितलं होतं. शेवटचं बोलणं देखील तिच्यासोबत झालं होतं. त्यानंतर पोलिसांना समजलं. शेवटचं बोलणं सुद्धा तिच्याशीच झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी पुष्पाला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरूच ठेवली. (Extramarital Affair)पोलिसांना घाबरून पुष्पाने भडाभडा सगळी हकीकत सांगून टाकली. अशाप्रकारे हे भयानक हत्याकांड आता समोर आलेलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
News Title – Extramarital Affair Murder Case In Bihar
महत्त्वाच्या बातम्या
“घटस्फोटानंतर मी खूप आनंदी आहे, मला…”; आमिर खानच्या एक्स पत्नीने अखेर मौन सोडलं
विराट कोहलीबाबत गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला…
सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या एकच महिन्यांनी दिली गुड न्यूज?, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल
अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
“पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात भांडण झालंय, त्यांनी..”; संजय राऊत यांची टीका