लग्न केलं एकासोबत आणि रहायचंय बॉयफ्रेंडसोबत, विवाहीत महिलेची अजबच मागणी

Extramarital Affairs | विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) हा चावून चोथा झालेला विषय आहे. सध्या अशी अनेक प्रकरणं पाहायला मिळतात. जिथे लग्नानंतर बायकोचं किंवा नवऱ्याचं बाहेर अफेयर (Extramarital Affairs) सुरू असतं. असंच उत्तर प्रदेशमधील  आगरामध्ये एक प्रकरण समोर आलं आहे. यात पत्नीने पतीसमोर चक्रावून ठेवणारी एक मागणी ठेवलीय. तिला नवऱ्यासोबत रहायचं नाही.  पतीपासून जन्माला आलेल्या दोन मुलीचा खर्च मात्र पतीने करावा आणि बॉयफ्रेंडसोबत रहायचं असल्याची मागणी पत्नीने केली आहे.

पतीने ठरवलं आहे की जर तिला तिच्या प्रियकरासोबत रहायचं असेल तर तिने एकही रूपया मागायचा नाही. हा विषय आता कौटुंबिक केंद्रात गेला आहे. काऊन्सलरसमोर महिलेने ही घटना मांडली. तेव्हा तो हैराण झाला. नवरा माझा आहे. मुलीदेखील माझ्या आहेत. मला माझ्या बॉफ्रेंडसोबत रहायचं आहे. दोन मुली मला नवऱ्यापासून झाल्या आहेत. त्यामुळे खर्चाची नवऱ्याची जबाबदारी आहे, असं ती म्हणाली आहे. (Extramarital Affairs)

“…तर मी खर्च का देऊ?”

त्यावर पत्नीचं म्हणणं आहे की, जर पत्नी माझ्यासोबत रहातच नाहीये, तर खर्च मी का देऊ?, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यानंतर तो म्हणाला की जर प्रियकरासोबत राहायचं असेल तर मी खर्च का उचलावा? काऊन्सलरने प्रश्न केला की, तु असं का करत आहेस? त्यावर पत्नी म्हणाली की, नवरा हा बाहेर असतो. तो मला वेळ देऊ शकत नाही. (Extramarital Affairs)

पत्नी म्हणाली की “मला पती वेळ देत नाही. तो बाहेर असतो. मला एकटेपणा वाटायचा. माझे प्रेमसंबंध निर्माण झाले. माझा बॉयफ्रेंड विवाहीत आहे. त्याला मुलं आहेत. त्यांच्यावर कुटुंबाचा भार आहे. अशा स्थितीमुळे तो खर्च उचलू शकत नाही. म्हणून नवऱ्याने माझा आणि मुलीचा खर्च उचलावा”.

काऊन्सलरने व्यक्त केलं मत

यावर आता काऊन्सलरने मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला की, दोघांच्या विवाहाला आता 10 वर्षे झाली आहेत. पत्नी हथरस येथे राहणारी आहे. पती आगरा येथे राहणारा आहे. पत्नीला आता प्रियकरासोबत राहायचं आहे. म्हणून नवऱ्याकडे तिने महिन्याचा खर्च मागितला आहे. मात्र पती खर्च उचलणार नाही असं सांगत आहे. सध्या दोघांमध्ये तडजोड झालेली नाही. दुसरी तारीख देण्यात आली आहे.

News Title – Extramarital Affairs Wife Want To Live With her Boyfriend And Demand To Husband About Monthly Money

महत्त्वाच्या बातम्या

तृणमूल नेत्याची भर रस्त्यात महिलेला अमानुषपणे मारहाण; व्हिडिओ व्हायरल

“हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, समजने वाले को इशारा काफी”

सूर्याच्या कॅचवरून आफ्रिकन चाहत्यांचे सवाल; माजी दिग्गज खेळडूने दिलं जोरदार प्रत्युत्तर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी; LPG सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त

‘वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली….’; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांनी खळबळ