बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेकोट्या पेटल्या! ‘या’ तारखेनंतर थंडी आणखी वाढण्याची शक्यता

पुणे | गेल्या तीन चार दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे हिवाळ्यात (Winter) पावसाळा चालू असल्याचा अनुभव आला होता. अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे घरातून बाहेर निघणं देखील कठीण झालं होतं. अशातच आता राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी (Extreme Winter) पडल्याचं दिसत आहे.

अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता कमी झाल्याने आता पुणे, मुंबईसह सर्वत्र पारा खाली गेल्याचं दिसत आहे. पुण्यात तापमानाचा (Pune Temperature) पारा आता 13 अंशावर गेला आहे. अशातच 15 डिसेंबरनंतर राज्यात थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर पुढील पाच राज्यात वातावरण कोरडं असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

रविवारी महाबळेश्वर येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे रविवारी 12.6 अंश सेल्सिअस तापमान होतं. तर मुंबईत 22 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी पुण्यात 13.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे.

दरम्यान, हिवाळा सुरू झाल्यामुळे आता स्वेटर, कानटोप्या, ग्लॅब्ज बाहेर निघू लागले आहेत. तर मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे आजारी पडण्याचं प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची देखील गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर OBC आरक्षण परत मिळू शकतं”, फडणवीसांनी सांगितला फाॅर्म्युला

चिंता वाढली! पुणे आणि डोंबिवली पाठोपाठ ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

“मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करतो, पण ते माझा फोन घेत नाहीत”

OBC Reservationचा वाद पेटला! भुजबळ म्हणतात,”फडणवीस त्यांना थांबवत का नाहीत?”

“नाना पटोलेजी राजकारण ठेवा बाजूला, तुम्ही स्वत:ला OBC नेता समजता ना?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More