बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर!

मुंबई | फोन टॅपिंगवरून राज्यात आरोप प्रत्यारोपांची फैरी झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली.

समितीने अहवाल सादर केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तो स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. शुक्ला यांनी पुण्यातील कार्यकाळात पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचं अहवालात म्हटलं आहे. आता याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, राज्याचे माजी पोलिस महासंचालक आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या निवासस्थानांवर सीबीआयने छापेमारी केली आहे. संजय पांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सीबीआयनं संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगडमधल्या घरी छापेमारी केली. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. एनएसई घोटाळ्यातील आरोपी चित्रा रामकृष्णन यांनी संजय पांडे यांना एनएसईशी संबंधित लोकांचे फोन रेकॉर्ड करण्यात सांगितलं असा आरोप होतोय.

थोडक्यात बातम्या- 

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू!

अल्ट न्यूजचे संचालक मोहम्मद जुबेर यांना न्यायालयाचा दिलासा!

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला!

‘…म्हणून आमदार शिवसेनेतून भाजपात गेले’, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

‘घरात घुसून मारलं होतं ना?’, कंगना रनौतने पुन्हा करण जोहरला डिवचलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More