बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धर्मवीर सिनेमाच्या टीमवर ‘समरेणू’च्या दिग्दर्शकांचे अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

मुंबई | सध्या कलासृष्टी जोमात पहायला मिळत आहे. अनेक चित्रपट प्रदर्शित होत असून कमाईही बक्कळ होत आहे. बाॅलिवूड, टाॅलिवूड आणि मराठी चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घातला आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

धर्मवीर सिनेमाच्या टीमवर ‘समरेणू’च्या दिग्दर्शकांनी दैनिक बोंबाबोंबच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. धर्मवीर चित्रपटाची टीम पीव्हिआर, वगैरेंना प्रेशराईज करत आहे की, आमचेच सिनेमे घ्या, त्यामुळे आमच्या समरेणूच्या चित्रपटाला शो लावायला जागाच नाहीये, असं समरेणूचे दिग्दर्शक महेश डोंगरेंनी म्हटलं.

आज आमच्या चित्रपटाचा प्रिमीयर आहे. मला सगळं संपल्या सारखं वाटतंय आणि उद्या मी कुठे असणार मला माहित नाहीये. त्यामुळे पुढे काय होईल त्याला फक्त धर्मवीरची टीम जबाबदार असेल, असं समरेणूचे दिग्दर्शक महेश डोंगरेंनी म्हटलं.

दरम्यान, एकनाथ शिंदेना मी आवाहन करतो की, एका मराठी चित्रपटाला जगवण्यासाठी दुसऱ्या मराठी चित्रपटाला मारु नका. तुमची जी टीम आहे, धर्मवीर चित्रपटाची त्या टीमला सांगा असं काही करु नका. दोन्हीही चित्रपटाच्या टीमला सहकार्य करा, असंही महेश यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

सोन्याच्या दरात आज काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

नवनीत राणांची पुन्हा नवी घोषणा, म्हणाल्या…

“आम्ही घाबरणारे नाहीत तर…”; नवनीत राणा आक्रमक

“राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मनसेचा गंभीर इशारा

मोठी बातमी! एमपीएससीकडून ‘इतक्या’ पदांसाठी भरती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More